Category: छोटी चिव चिव…


एक बातमी 

“…..महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी २३ लाख. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील दुस-या क्रमांकाचं राज्य ठरलंय. देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून, अस्ताव्यस्त पसरलेल्या ठाणे जिल्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ठाण्याची एकूण लोकसंख्या १ कोटी दहा लाख ५४ हजार १३१ इतकी आहे. ….”

— मला वाटते…….आता गेले कित्येक वर्ष ठाण्यासह पूर्ण महाराष्ट्रात लोड शेडींग चालू आहे. आता जनतेला लाईट नसल्यावर अंधारात दुसरे काय काम असणार ? एकच तर मनोरंजन आहे.

6th century

Image via Wikipedia

येयेयेयेयेयेयेये !!!!!!!

इंडिया जिंकली…..आणि ते सुद्धा साधीसुधी नाही….तर त्या आकडू आणि नौटंकी ऑस्ट्रेलियाला डायरेक्ट घरी पाठवूनच…..साल्यांना असाच पाहिजे….कधी खिलाडूवृत्तीने खेळलेच नाही. आज पण पहिल्या षटकापासून साल्यानी स्लेजिंग चालू केली होती पण शेवटी इंडियाने त्यांचा नशा उतरवला.

आणि महत्वाचे म्हणजे सुरेश रैनाने त्याच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ केला तो युसुफ पठाण असता तर १० ओवर आधीच संपली असती. तशी मध्ये धावचीत होऊन आपल्या फलंदाजांनी बावळट पण केला होता पण आजचा दिवस आपला होता.

हिप हिप हुर्रे

थ्री चीअर्स !!!!!!!!!

देवा तुझे आभार ……………..

शिवाजी महाराजांचा खरा फोटो

 

शिवाजी महाराजांचा खरा फोटो त्यांच्या हस्ताक्षारासाहित

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त काही तरी लिहायचे होते. पण त्यांच्याबद्दल महान लेखकांनी आधीच खूप काही लिहून ठेवले आहे. त्यात माझ्या सारख्या पामराची काय कथा ??

त्यांच्या जयंती निमित्त एकच लिहू शकतो

शिवरायांचे आठवावे रूप !!! शिवरायांचा आठवावा प्रताप.

जय शिवाजी !!! जय भवानी !!!