ठाणा-मुंबईतील वातावरण इतके सुंदर कधीच नव्हते. खूप दिवसांनी -वर्षांनी असे आल्हाददायक वातावरण मुंबई मध्ये अनुभवायला मिळतेय. सुंदर समुद्र किनारा असूनही अति प्रदूषणामुळे इथले वातावरण नेहमीच दमट असते. अंगाला नेहमीच घामाच्या धारा असतात. दुपारचे उन म्हणजे तर बघायलाच नको. पण ह्या वर्षी जसा पाऊस चांगला पडला तशी थंडी हि पडायची इच्छा खूप होती. मुंबईकर आतुरतेने वाट बघत असतात अश्या थंडीची. असे खूप कमी होते कि मुंबईत राहाताना स्वेटर किवा जाकेट जुन्या कपड्यातून शोधून काढावे लागतात पण ह्या वर्षी तसे झाले नाही अगदी दुपारी सुद्धा लोक स्वेटर घालून फिरताहेत. बाईक वरून जाताना थंडीने अंगात एक शिरशिरी येते.

दर वर्षी हवामान खात्यावाले सांगत असतात ह्या वर्षी एवढी थंडी पडेल, तेवढी थंडी पडेल, उत्तरेकडून थंड वारे येतील, मुंबईचे तापमान एवढे कमी होईल. पण निसर्ग आपल्याच धुंदीत असल्याप्रमाणे त्यांची सगळी भाकीत चुकवत मजा करत असतो. ह्या वेळेला तर त्यांना भाकीत करायलाहि वेळ नाही दिला..गुपचूप  गुलाबी थंडीसह आगमन केले.

आता हा ब्लॉग लिहीत असताना सुद्धा खिडकीतून मस्त थंड वर सुटलाय. अगदी अंगाला झोंबतोय.

टिव्ही वर स्वेटर ची जाहिरात लागली आहे. ….थंडी ….थंडी…..