काल बातम्या बघताना अचानक एक घटनेने लक्ष वेधले आणि खुप वाईट हि वाटले. लोकशाहिर विठ्ठल उमप यांचा नागपुर मधील एका कार्यकमात ह्रुदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्यासारखा एक लोककलेचा सच्चा सेवक महाराष्ट्राने गमावला. एका कलावंताला अजुन काय हवे असते? आपल्या दर्दी प्रेषकांसमोर रंगमंचावरच कलेची सेवा करताना सर्वांचा निरोप घ्यायचा. प्रत्येक कलावंताची हिच तर सुप्त इच्छा असते.देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.