त्या दिवशी तब्येत बरी नव्ह्ते म्हणुन डॉ. इंदोरिया च्या दवाख़ान्यात गेलो होतो. ह्या डॉक्टर ची डिस्पेंसरी बरोबर मोठा दवाख़ना हि आहे. तपासुन बाहेर पडणार तेवढ्यात जोरात पाउस आला. मि आणि विजु (माझी बायको) तिथेच बाकड्यावर बसलो. गप्पा मारताना समोरच्या एका माणसाकडे लक्ष गेले. जवळपास पन्नाशी चा असावा आपल्या वडिलांच्या वयाचा. कपडे चुरगळलेले होते. शर्टाची वरची दोन बटणे उघडी होती आणि त्यातुन मळकट झालेली बनियान पण दिसत होती. सफेद दाढीची रोपं सगळ्या गालावर वाढली होती. बहुतेक परीस्थीती पण जेमतेम च असावी.

त्याचे पण कोणितरी दवाखान्यात ऍड्मिट होते बहुतेक. कदाचित बायको असावी आणि बहुदा खुप दिवस असावी त्यामुळे चेहर्‍यावर जरा त्रासिक पना वाटत होता. भुक लागली होती. म्हणुन जेवायला खाली आला होता. जेवण काय होते तर विब्स चा ब्रेड आणि दहि चा डब्बा. पावाचे एक-एक तुकडे करुन दह्या मध्ये बुडवुन खात होता. बघुन दया आली त्याची. बहुदा कोणि नातेवावईक किंवा मुले पण जवळ नव्ह्ती. जेवन घरुन आले नव्ह्ते म्हणजे नक्कीच बायको ऍड्मिट असणार. त्याला खाताना बघुन एक भटका कुत्रा आशेने जवळ येत होता. आणि तो बिचारा त्याला हाकलायचा प्रयत्न करत होता. क़ुत्रा पण न घाबरता त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करत होता.तो बिचारा हात उचलुन शुक.. शुक… करत होता आणि कुत्रा दह्याच्या डब्याजवळ तोंड न्यायच्या प्रयत्न करत होता. मग त्याने जोरा जोरात पाय आपटुन हाड हाड करत त्याला हाकलले. कुत्रा शेपुट घालुन कोपर्‍यात जाउन बसला आणि आशेने त्याच्याकडे बघत राहिला.

किती तो माणुस दुःख़ात असेल ? जवळपास कोणि नातेवाईक नसेल आणि हॉस्पिटल मध्ये कोणि अँडमिट असेल तर् क़िती हालत खराब होते ते ज्याचे त्यालाच् माहित असते. सगळ्या घराचाच दवाखाना होउन जातो. तो पण बहुतेक आजारपणाला आणि परिस्थीतिला कंटाळला असावा. नुसत्या ब्रेड आणि दह्यावर माणुस न जेवता कसा काय राहु शकतो?

पाउस थांबायचे नावच नव्हता घेत. तसेच बसुन होतो.  तो पर्यंत त्याचे खाउन झाले. उरलेला पाव त्याने तसाच पिशवीत गुंडाळुन ठेवला आणि तिथेच बाकड्यावर आडवा झाला. डोळ्यावर लाईटीचा प्रक़ाश येत होता म्हणुन हात आडवा घेउन झोपी पण गेला. पाउस पण कमी झाला होता. म्हणुन निघालो पण तो माणुस त्याचा चेहरा, परिस्थीती, वाढ्लेली दाढी, ब्रेड आणि दहि, बाकड्यावर तसेच झोपने लक्षात राहिले. विजु ला पण बघुन वाईट वाटले. ती म्हणाली ‘देव अशी हालत कोणाचीच नको करुदे!’.

एक आठ्वड्यानंतर परत जेव्हा चेकअप ला गेलो तेव्हा तो माणुस दिसला नाहि. वाटले कदाचित त्याच्या बायकोला डिस्चार्ज़ मिळाला असावा. डॉक्टर कडे गर्दी असल्यामुळे जवळपास एक-दिड तास बसुन राहावे लागले. तपासुन जेव्हा निघालो तेव्हा तोच माणुस समोरच्या बाकड्यावर झोपायच्या तयारीतच होता. बाजुला दह्याचा रिकामा डबा आणि विब्स ब्रेड चा कागद पडला होता. नुकतेच जेवण झाले होते बहुतेक. पण आज चेहर्‍यावर जरा त्रासीकपणा कमी होता आणि दाढी पण चांगली तुळतुळीत केली होती. कदाचित बायको बरी झाली असावी.

देव करो त्याची बायको बरी व्हावी आणि त्याला चांगले जेवन करुन घालु देत.