खुप दिवसापासुन लिहायचे होते. पण वेळ च नव्ह्ता भेटत. मना मध्ये खुप विचार घोळत असतात. पण लिहायला बसलो कि एक तर कंटाळा तरि येतो नाहितर काहि सुचतच नाहि. आज खुप वैताग आला होता. मुड नाहि होत आहे काहि करायला. त्यात हा फोटो बघितला. एवढा दु:खद फोटो कधिच बघितला नव्ह्ता. खुप वाईट वाटले हा फोटो बघुन.

देव पण एवढा निर्दयी कसा होउ शकतो. बिचारा त्याला समजले पण नसेल कि आपण आत मरणार आहोत. कदाचित कुठे बाहेर फिरायला जायच्या तयारीत असेल. पायात चप्पल घालुन तयार होता. कदचित शेवट्च्या क्षणि त्याला समजले असेल. घाबरुन त्याने आपली हाफ पँट आपल्या ईमुकल्या हातात घट्ट पकडली आहे. दुसर्‍य़ा हाताने कोनाला तरी बोलवायचा प्रयत्न केला असेल. म्हणुन हात मोकळा आहे. तो क्षण कसा असेल जेव्हा त्याने शेवट्चे डोळे मिटले असतील ? त्याचे आई वडिल समोर असतील का ? त्यांना काय वाटले असेल ? आपल्या मुलाचा मृत्य आपल्या डोळ्यांनि बघताना ?
असे वाटतेय उगाच हा फोटो बघीतला. उगाच एक बेचैनी लागुन राहली आहे.